1 Daizilkree

Essay On My Favourite Season Monsoon In Marathi

Essay On The Season I Like The Best Winter

Urdu Point Essay Urdu Point Essay Aqua Ip Urdu Point Essay Urdu

Essay On Autumn Season Order A Custom Essay From The Best Non

Rainy Season Images For Kids Clip Art Clip

Short Article On Rainy Season

Rainy Seasons Clipart Images

Essay About Rainyday

Words Autumn Season Essay For Class Creative Essay

Short Essay On Winter Season For Kids

Seasonal Weather Forecast

Essay In Marathi Language On Rainy Season Essay Topics

Paragraph Essay About Summer

Best Friend Essays Qualities Of A Best Friend Gcse English Marked

Sample Memoir Essay

Essay On Rainy Day For Kids Academic Essay

Rainy Day Essay

Essay On Rainy Day For Kids Academic Essay

Rainy Season Begins In The

Essay Children Child Abuse New Essay The Child Abuse Short Essay

Rainy Season Essay In Marathi Marathi Essay On My Favourite

Rainy Season Essay in Marathi

पावसाळा : माझा आवडता ऋतू

आला आला पाऊस आला, वारा वाहे चोही कडे…वा ह्या कल्पनेनेसुधा खुप खुप आनंदी वाटते. असा हा पाऊस येताच मन प्रसन्न होते.
लहान, तरुण व वयोवृद्ध सगळ्यांनाच आवडणारा हा पाऊस सुरू होतो साधारण जुन च्या पहिल्या आठवड्यात . एप्रिल व मे मधे आंबे खाऊन सुस्त झालेले व उकाड्याने हैराण झालेले आपले शरीर व मन ह्याच त्या पावसाची आतुरतेने वाट बघत असते , कधी एकदाचा हा पाऊस येतो आणि आपल्याला थंडावा देतो. पहिला पाऊस येताच धरणीचा तो सुगंध जगातल्या सगळ्या महागड्या अत्तरांपेक्षा खुपच सरस व अप्रतिम, ज्याची ना कुठे बरोबरी न हा सुगंध कुठल्या बाटलीत भरता येतो. त्या मुळे हा सुगंध आपल्याला भरभरून घेऊन आपल्या मनात साठवुन ठेवावा लागतो थेट दुसऱ्या पावसाळ्या पर्यंत !

पावसाची मज्जा :

इथे सुरुवात होते पावसाळ्याची अरेच्या ,तुम्ही पण हुळूच ह्या वातावरणात पोहचलात की काय ?

पाऊस हा अगदी सगळ्यांचा लाडका आणि प्रत्येकाची आनंद घेण्याची पद्धत ही अनोखी .लहान मुले मस्त चिखलात खेळून ,पाण्यात होड्या सोडून व पावसात चिंब भिजून मजा करतात, इथे आई ओरडून ओरडून कंटाळते पण ही चिमुकली आनंद लुटण्यात इतकी का मग्न असतात की घरी आल्यावर मार खायची पण त्यांची तयारी असते पण तो चिखल, त्या होड्या ,काही त्यांना सोडवत नाही ..आता तरुणाई! तिची पावसाची मज्जा घेण्याची कल्पनाच निराळी! मस्त गाड्या घेऊन लांब भटकंती करायची, मधेच एखाद्या टपरी वर थांबून चहा व भज्यांवर, ताव मारायचा ,एकमेकांना पाऊस ओंजळीत घेऊन भिजवायचे। तर कुणी ट्रेक ला उंच गड, किल्ले, डोंगर सर करायला निघतात। मधेच ते वाहणारे झरे, ते पाणी पिणे ,त्यात परत चिंब भिजणे .सगळं सगळं विसरून ही तरुणाई स्वछंद अश्या जगात असते .अरे हो, मक्याचे कणीस तर राहिलेच की॰ त्यावर ताव नाही मारला तर कसं चालेल बरं? मग आली आपली जेष्ठ मंडळी॰ ही बाहेर जाऊन भिजू शकत नाही तर मस्त पैकी कुणी आलं-गवती चहा चा मित्रांसोबत घोट घेत जुन्या आठवणींना उजाळा देतात तर कुणी कॉफी , पुस्तक व सुमधुर संगीताच्या जुन्या आठवणीत रमतात. असा हा पाऊस आल्हाददायक ,मनमोहक व आनंद देणारा!

निसर्गाचा जल्लोष :

हा झाला आनंद देणारा पाऊस. ह्यानं माणसांना तर आनंद होतोच पण पशु ,पक्षी हे देखील उल्हासित होतात. झाडे पाने तर आनंदाने जसे पावसाच्या तालावर नाचतात॰ एका पावसातच ही हिरवीगार होतात॰ टवटवीत होऊन आनंद व्यक्त करतात. पृथ्वी जसा सुंदर हिरवा शालु नेसुन प्रसन्न मुद्रेने आपला आनंद व्यक्त करत असते, ह्या हिरव्यागार धरणी कडे बघत च बसावेसे वाटते. सकाळी पडणारे ते हलकेसे धुके , मधुनच येणारी ती रिमझिम , कधी हळूच डोकावणारा तो सूर्यप्रकाश आणि हो सप्तरंगांची उधळण करणारा तो इंद्रधनुष्य, ज्याला बघण्यासाठी आपण आतुर असतो. एकदा का तो नजरेस पडला कि जसे स्वर्ग सुख! लहान मोठया सगळ्यांना मोहित करणारे हे इंद्रधनुष्य म्हणजे जसे आपल्या डोळ्यांना मिळणारा निसर्गाचा एक ‘नायब तोहफाच’ ! उन्हाळ्यात जे पक्षी चिडी चुप असतात तेच ह्या पावसाळ्यात गाणे गाऊन देवाच्या ह्या देणगीचे धन्यवाद करतात. जंगल तर पक्ष्यांच्या किलकिलाटाने नुसते दुमदुमुन जाते ,व जनावरे उल्हसित होऊन निरनिराळे आवाज काढुन आपला आनंद व्यक्त करतात. हाच तो पावसाळा, आनंद देणारा, उल्हसित करणारा, कधी येतो असा ध्यास लावणारा, सगळ्या पृथ्वी ला आनंदी व प्रफुल्लित करणारा!

पावसाचे तांडव :

पावसात खळखळून वाहणारे ते झरे, तुडूंब वाहणाऱ्यात्या नद्या, फेसाळणारा तो समुद्र, अथांग उसळणाऱ्या त्या उंच उंच लाटा, खरं तर खुप प्रेक्षणीय असतात. पण ह्यानेच जर का रौद्र रूप धारण केले तर ते महाभयंकर होऊ शकते. पुराची शक्यता वाढते. ज्यात जिवित व वित्त हानी प्रचंड प्रमाणात होऊ शकते. अति वृष्टीने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान संभवते, वाहतुक खोळंबा, दरडी कोसळणे, वीज कोसळुन अपघात व जिवित हानी होणे हे या पावसाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तरीही संजीवनी देणारा हा पाऊस अत्यंत आवश्यक आहे.

हवाहवासा हा पाऊस वर्षातून एकदाच का येतो असे प्रत्येकाला वाटते . सगळीकडे कसे प्रसन्न वातावरण ,हवेत थोडासाच उष्मा, थोडी थंडी, मधेच ती रिमझिम, इतक सगळं छान छान असत की हे असेच का राहत नाही असे मनात सारखे येते. पण हा पाऊस कायमच राहणारनाही कारण अति तेथे माती ही म्हण त्यास योग्य लागु पडेल. असाच पाऊस कायम राहिला तर आपल्याला त्याचा हळु हळु कंटाळा येऊन तो नकोसा होईल, त्यातली मजा आनंद सगळे हळु हळु कमी होत जाईल व आपल्याला मज्जा देणारा हा पाऊस आपल्या साठी रोजचीच गोष्ट होईल मग त्यात गम्मत ती कुठली? तर हा पाऊस असाच येत जात राहो व आपल्याला खुप खुप आनंद देत जावो ही देवा चरणी प्रार्थना !

Composition – Pavsala Essay in Marathi Language Wikipedia

Majha / Maza Avadata Rutu Pavsala Monsoon Season

marathi nibandh for 9th std

Leave a Comment

(0 Comments)

Your email address will not be published. Required fields are marked *